शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदी ९ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार! तुमच्या शहराच नाव यादीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 19:17 IST

देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक रेल्वेगाडी असणारी वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसातच पीएम मोदी ९ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

गेल्या काही महिन्यात देशाला नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. शिर्डी, सोलापूरसह गोव्यासाठीही काही महिन्यापूर्वी एक्सप्रेस सुरू झाली, आता कोल्हापूरसह अन्य काही शहरांनीही या गाड्यांची मागणी केली आहे. पीएम मोदी २४  रविवारी २४ सप्टेंबर रोजी देशाला ९ नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट देणार आहेत. यामध्ये देशातील अनेक राज्ये आणि शहरांचा समावेश आहे. याद्वारे अनेक मार्गावरील प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल.

दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद

देशाला आणखी ९ सेमी-हाय स्पीड ट्रेनच्या रूपाने ९ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची भेट मिळेल. या गाड्या सुरू झाल्यामुळे देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक गाड्यांचा लाभ मिळणार आहे.

'या' राज्यांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेस

राजस्थान, गुजरात, तेलंगणा, ओडिशा, केरळ तसेच पश्चिम बंगालमधील हावडा आणि तामिळनाडूमधील चेन्नई येथे प्रत्येकी २ ट्रेन जाणार आहेत. भारतीय रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही पोस्टद्वारे काही ट्रेन्सची माहिती दिली आहे.

या मार्गावरुन धावणार

या ९ मार्गांवर वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. यात रांची-हावडा, पाटणा-हावडा, विजयवाडा-चेन्नई, तिरुनेलवेली-चेन्नई, राउरकेला-पुरी, उदयपूर-जयपूर, कासारगोड-तिरुवनंतपुरम जामनगर-अहमदाबाद आणि हैदराबाद-बेंगळुरू.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२३ मध्ये वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, फेब्रुवारी मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. वंदे भारत गाड्या १०० टक्के भारतीय तंत्रज्ञानाने बनवल्या आहेत, ज्या शताब्दी, राजधानी सारख्या गाड्या बदलण्यासाठी तयार केल्या जात आहेत. ही ट्रेन चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वे