शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडक भूमिकेनंतर 'ड्रॅगन'चा सूर बदलला; चीन म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 14:29 IST

भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन वेदांग यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन वेदांग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.चिनी राजदूत सुन वेदांग यांनी दोन्ही शेजारील देशांना परस्पर संधीची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, सामरिक भागीदारी वाढविण्यासाठी भारत आणि चीनने एकमेकांच्या विकासाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे स्थिर आहे आणि नियंत्रणात आहे. त्यानंतर चीनच्या राजदूताचे हे वक्तव्य समोर आल्यानं  त्याला  महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भारत-चीन हे दोन्ही देश हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यास सक्षम आहेत.विशेष म्हणजे पूर्व लडाखच्या क्षेत्रात अजूनही परिस्थिती तशीच आहे. येथे चिनी सैन्याने भारताच्या भागात घुसखोरी केली होती. दोन्ही देशांचे कमांडर संपर्कात आहेत. मंगळवारी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की, एलएसीवरील चिनी सैन्य मागे हटत नाही, तोपर्यंत भारताचे जवानही मागे येणार नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं होतं. चीनचे राजदूत सुन वेदांग म्हणाले, "आम्हाला एकमेकांच्या मतभेदांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे आणि दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्याच्या मार्गानं प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याचबरोबर संवादाद्वारे हळूहळू परस्पर मतभेद मिटवायला हवेत. वेदांग म्हणाले की, भारत आणि चीन मैत्रीपूर्ण  म्हणून चांगले शेजारी व सहयोगी राहिले पाहिजे.भारत आणि चीनला एकमेकांपासून धोका नाही. राजदूत सुन वेदांग यांनी काही पत्रकार आणि युवकांच्या प्रतिनिधींसमवेत वेबिनारमध्ये म्हटले आहे की, 'ड्रॅगन आणि हत्तीबरोबर एकत्र नृत्य करण्याची वास्तविकता समजून घेणे ही चीन आणि भारत या दोघांसाठी योग्य निवड आहे. याद्वारे दोन्ही देशांचे व त्यांच्या नागरिकांचे मूलभूत हित जपले जातील. दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून चीन आणि भारत यांनी परस्पर सहकार्य मजबूत केले पाहिजे.

हेही वाचाCoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ

CoronaVirus News: ...अन् फडणवीस पुन्हा आले; ठाकरे सरकारच्या 'त्या' दाव्यांची चिरफाड करून गेले

CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

 

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत