शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना येण्यापूर्वीच ज्यांनी केलं होतं भाकीत, त्या महंतांचा PM मोदींनी घेतला आशीर्वाद; नव्या भविष्यवाणीनं भरवलीय धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 00:14 IST

महंत करशनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राजकोटमधील जमकंदोराना येथे एका जनसभेला संबोधित केले. या दौऱ्यात पीएम मोदींनी महंत करशनदास बापू यांचीही भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही भारतीय जनता पक्षाकडून शेअर करण्यात आले. एवढेच नाही, तर पीएम मोदींनीही करशनदास बापू यांच्या भेटीचा उल्लेख आपल्या सभेतही करत, आपण बापूंचा आशीर्वाद घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

महंत करशनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता.  त्यात त्यांनी 2020 मध्ये विषाणूजन्य आजारामुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी केली होती. यानंतर त्यांनी नुकतीच 2023-24 मध्ये 'उपासमार' येण्याची भविष्यवाणीही केली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी हे टाळण्याचा मार्गही सांगितला आहे.

2023-24 मध्ये उपासमारीची भविष्यवाणी - बाजरी वाचवणार जीव -नुकताच करशनदास बापू यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,या व्हिडिओमध्ये ते 2023-24 मध्ये जगात उपासमारी येण्यासंदर्भात भविष्यवाणी करताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर यापासून वाचण्यासाठी ते लोकांना ज्वारी आणि बाजरी पेरण्याचा सल्ला देतानाही दिसत आहेत. एवढेच नाही, तर, आपल्याकडे बाजरी असेल, तर आपण पाण्यानेही जिवंत राहू शकता. तसेच, उपासमारीमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात