शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आसियान परिषदेस व्हर्च्युअली उपस्थित राहणार; एस. जयशंकर ‘ईस्ट एशिया समिट’ला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:17 IST

आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियातील क्वालालंपूर येथे वार्षिक आसियान परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या पूर्वनियोजित गोष्टींच्या वेळापत्रकातील अडचणींमुळे ते या परिषदेत २६ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअली सहभागी होतील.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून २७ ऑक्टोबरला क्वालालंपूर येथे होणाऱ्या २०व्या ‘ईस्ट एशिया समिट’ला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या परिषदेत पंतप्रधान आणि आसियान देशांचे नेते मिळून आसियान-भारत संबंधांचा आढावा घेतील. तसेच परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे.

‘बचके रहना रे बाबा’, काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेसाठी मलेशियाला न जाता आणि व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होणार असल्याने, काँग्रेसने गुरुवारी असा दावा केला की पंतप्रधान तिथे न जाण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोंडीत सापडायचे नाही. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनीपुढे म्हटले की, “मोदी या शिखर परिषदेपासून दूर राहत आहेत कारण ट्रम्पही तिथे असणार आहेत. पंतप्रधानांना बहुधा ते जुने बॉलिवूडच्या  चित्रपटातील गाणे आठवत असेल – ‘बचके रहना रे बाबा, बचके रहना रे...’

English
हिंदी सारांश
Web Title : PM to Attend ASEAN Summit Virtually; Jaishankar to Visit East Asia

Web Summary : PM Modi will virtually attend the ASEAN summit due to scheduling conflicts. S. Jaishankar will represent India at the East Asia Summit in Kuala Lumpur. Discussions will focus on strengthening ASEAN-India relations and cooperation. Congress alleges Modi avoids meeting Trump at the summit.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर