शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

“अ‍ॅक्ट ऑफ गॉड नाही तर अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड”; पूल दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदींचा ‘तो’ Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:55 IST

Narendra Modi Video : भीषण पूल दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोरबीमध्ये असलेला हा पूल गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. जवळपास 2 कोटीहून अधिक रक्कम खर्च करून पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं आहे. त्यानंतर 25 ऑक्टोबरला तो पूल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला होता. 

भीषण पूल दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मोदींनी 2016 मध्ये कोलकाच्या विवेकानंद रोड फ्लायओव्हर दुर्घटनेनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. “पूल पडल्याची घटना ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ नाही, तर ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे. हा ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’चा परिणाम आहे. निवडणुकीच्या दरम्यान हा पूल पडणं खरं तर ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे. यांनी कसं सरकार चालवलं हे माहित व्हावं, यासाठी हा देवाचा संदेश आहे” असं मोदींनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपाचं सरकार, हेच तुमच्या विकासाचं मॉडेल आहे का?”

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या पूल दुर्घटनेनंतर भाजपावर निशाणा साधला आहे. मोदीजी मोरबीची पूल दुर्घटना ही अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे की अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड आहे? सहा महिन्यापासून पुलाची दुरुस्ती केली जात होती. यासाठी किती खर्च आला? पाच दिवसांतच पूल कोसळला. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे, हेच तुमच्या विकासाचं मॉडेल आहे का? असा खोचक सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे.  भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांच्या 12 नातेवाईकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला असून यामध्ये  बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे. “या पूल दुर्घटनेत मी 5 मुलांसह माझ्या कुटुंबातील 12 सदस्य गमावले आहेत. तसेच, मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत” असं कुंदारिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी