शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:06 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामीची मानसिकता संपवली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत पाहायला मिळते. 

पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत घटक होते. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे.

'महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता नेहमीच सर्वोच्च ठेवली, आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब 'एक भारत-उत्तम भारत' या संकल्पनेत पाहायला मिळते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने देशवासीयांचा आत्मविश्वास हिरावून घेतला होता, अशा काळात लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे कठीण काम होते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते, त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. ते त्यांच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टीकोनही मांडला. राज्यकारभाराचे लोककल्याणकारी चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवले.  त्यावेळी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे अवघड काम होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केवळ आक्रमकांशीच लढा दिला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaigadरायगडBJPभाजपा