शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मोदींनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:39 IST

विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली. यावेळी बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. 'मी येथे येत असताना काही विद्यार्थ्यांनी याठिकाणी पाण्याची समस्या असल्याचं मला सांगितलं. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो,' असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'मी याठिकाणी एक पाहुणा म्हणून नव्हे, तर कुलगुरु म्हणून आलोय. गुरुंकडे गेल्याशिवाय विद्या मिळत नाही, असं आपली संस्कृती सांगते. रविंद्रनाथ टागोर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीवर इतक्या प्राध्यापकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळतेय, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो,' असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचा विशेष उल्लेख केला. 'इथल्या जमिनीला गुरुदेवांच्या पायांचा स्पर्श लाभलाय. केव्हा तरी त्यांनी याच ठिकाणी त्यांनी महात्मा गांधींसोबत चर्चा केली असेल, असा विचार मी जेव्हा गाडीतून उतरलो, तेव्हा माझ्या मनात येऊन गेला,' अशा शब्दांमध्ये मोदींनी टागोर आणि महात्मा गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदींनी यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही उल्लेख केला. 'एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित आहेत, असं बहुधा पहिल्यांदाच घडलं असावं. भारत आणि बांगलादेश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात,' असं मोदींनी म्हटलं. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होत्या. दीक्षांत समारंभानंतर मोदी झारखंडचा दौरा करणार आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालStudentविद्यार्थी