शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना जात-धर्म पाहत नाही, संकटांचा सामना करण्यासाठी एकता आणि बंधुताच महत्वाची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 21:31 IST

पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एकता आणि बंधुता महत्वाची असल्याचे म्हणत, कोरोना व्हायरस जात-धर्म पाहत नाही, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देमोदी म्हणाले, कोरोना व्हायरस हल्ला करण्यापूर्वी जात, धर्म, रंग, समुदाय, भाषा अथवा सीमांचा विचार करत नाहीतरुणांनी भरलेला भारत देश कोरोना संकटानंतर जगाला नवे बिझनेस मॉडेल देईल - मोदीसंकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल सर्व दुकानदार आणि व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत, असेही मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. बडे-बडे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. भारतातही कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी एकता आणि बंधुता महत्वाची असल्याचे म्हणत, कोरोना व्हायरस जात-धर्म पाहत नाही, असे म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या एका ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'कोरोना व्हायरस हल्ला करण्यापूर्वी जात, धर्म, रंग, समुदाय, भाषा अथवा सीमांचा विचार करत नाही. यामुळे आपल्या प्रतिक्रिया आणि आचरणात एकता आणि बंधुतेला महत्व द्यायला हवे. आम्ही यात सोबत आहोत : पीएम नरेंद्र मोदी.'

दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे -मोदी म्हणाले, भविष्यातही दुकानांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल सर्व दुकानदार आणि व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. छोट्या-छोट्या दुकानदारांनीही संपूर्ण सामाजिक व्यवस्था योग्य प्रकारे राखत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. समाज आणि देश यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवील. स्वतः सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि इतरांनाही करायाला लावणे, हे अत्यंत कठीन काम आहे. जरा कल्पना करा, की आपल्या छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून आपल्याला आवश्यक गरजा पुरवल्या नसत्या तर काय झाले असते? 

एका नव्या बिझनेस मॉडेलची आवश्यकता -सोशल मीडिया लिंक्डइनवर मांडलेल्या आपल्या विचारांत मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगाला जाणीव झाली आहे, की आता एका नव्या बिझनेस मॉडेलची आवश्यकता आहे. तरुणांनी भरलेला भारत देश कोरोना संकटानंतर जगाला हे नवे मॉडेल देईल. कोरोना संकटाने किती बदल केला आहे. कुणीही ज्याचा विचार केला नसेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSocial Mediaसोशल मीडियाLokmatलोकमत