शहरं
Join us  
Trending Stories
1
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
2
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
3
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
4
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
5
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
6
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
7
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
8
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
9
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
10
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
11
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
12
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
13
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
14
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
15
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
17
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
18
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
19
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
20
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
Daily Top 2Weekly Top 5

देशाची माफी मागून सांगतो की...; कृषी कायदे रद्द करताना PM मोदी काय म्हणाले वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 10:15 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; तीन कृषी कायदे मोदी सरकारकडून रद्द

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

देशाला संबोधित करताना काय म्हणाले मोदी?- देशात तीन कृषी कायदे आणण्यामागे उद्देश हा होता की देशातील शेतकऱ्यांना खास करून छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं.. शेतमालाला योग्य किंमत मिळावी आणि शेतमाल विकण्यासाठी जास्त पर्याय मिळावेत.- अनेक वर्षांपासून ही मागणी शेतकरी, शेती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संघटना करत होत्या. आधीही अनेक सरकारांनी मंथन केलं... यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि मग हे कायदे आणण्यात आले. कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांनी, संघटनांनी स्वागत केलं. त्यांचा मी आभारी आहे. 

- शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गाव-गरिबांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेनं, प्रामाणिक हेतूनं कायदे सरकारनं केले. पण ही पवित्र बाब, शेतकऱ्यांच्या हिताची बाब प्रयत्न करूनही आम्ही शेतकऱ्यांना समजू शकलो नाही.- भले शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांना विरोध करत होता. तरीही आमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं. अर्थशास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकऱ्यांनी, तज्ज्ञांनी त्यांना हे कायदे समजावण्याचा प्रयत्न केला. नम्रपणे, मोकळ्या मनानं त्यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न केले. अनेक माध्यमांद्वारे, व्यक्तिगत आणि सामूहिक संवाद साधला. शेतकऱ्यांची मतं, तर्क समजून घेण्यातही कसूर ठेवली नाही. 

- कायद्यातील ज्या तरतुदींबद्दल आंदोलक शेतकऱ्यांना आक्षेप होता, त्या बदलण्याची तयारी सरकारनं दर्शवली. दोन वर्षांसाठी कायदे निलंबित करण्याचाही प्रस्ताव दिला. सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण गेलं.- आज देशवासियांची क्षमा मागून, प्रामाणिकपणे मी म्हणू इच्छितो की आमचे प्रयत्नच कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना चांगले कायदे समजावू शकलो नाही.- आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू.- आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिन है. आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन