शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'हे लोक मुघलांपेक्षा कमी नाहीत', राहुल आणि लालू कुटुंबावर पीएम मोदींचा घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:33 IST

PM Modi on INDIA Alliance : 'या नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांचा आदर नाही.'

PM Modi on INDIA Alliance : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रचार सभेतून विरोधकांवर निशाणा साधत आहेत. आजही त्यांनी विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या वर्षी पवित्र श्रावन महिन्यात मटण खाल्ल्याचा आरोप करत पंतप्रधानांनी राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यावर टीका केली. पंतप्रधान म्हणाले की, या नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांची पर्वा नाही.

मुघलांशी तुलनाजम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील निवडणूक रॅलीत बोलताना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा उल्लेख केला. त्या व्हिडिओत आरजेडी नेते लालू यादव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी एकत्रित मटण खाताना दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी त्यांची तुलना थेट मुघलांशी केली. तसेच, त्यांच्यावर 'देशातील बहुसंख्य लोकांना चिडवण्याचा' प्रयत्न केल्याचा आरोपही केला. 

संबंधित बातमी- "जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका"; मोदींची मोठी घोषणा

तेजस्वीच्या व्हिडिओवरही टोमणा तेजस्वी यादव यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन निर्माण झालेल्या वादावरही पीएम मोदींनी प्रतिक्रिया दिली. पीएम म्हणाले की, नवरात्रीत मांसाहार करणे दर्शविते की, त्यांना सामान्य लोकांच्या भावना दुखावायच्या आहेत. हे सर्व करून कोणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात? कायदा कोणालाही काहीही खाण्यापासून रोखत नाही, परंतु या लोकांचा हेतू दुसराच काही आहे. मुघलांना मंदिरे उद्ध्वस्त केल्याशिवाय समाधान मिळाले नाही. मुघलांप्रमाणे यांनाही देशातील जनतेला चिडवाल्यशिवाय समाधान मिळत नाही, अशी टीकाही पीएम मोदींनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस