शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

N फॉर न्यू इंडिया, D फॉर.., मोदींनी सांगितला NDAचा अर्थ; म्हणाले, 'ते' कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 22:58 IST

यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला.

एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटक पक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. मोदी म्हणाले, एन फॉर न्यू इंडिया, डी फॉर डेव्हलप्ड नेशन आणि ए फॉर एस्पिरेशन ऑफ पीपल ऑफ इंडिया.

जवळ येऊ शकता, सोबत नाही...- मोदी म्हणाले, "हे पक्ष का एकत्र येत आहेत? जनता सर्व पाहत आहे. पक्षांना जोडणारा धागा काय आहे? वैयक्तिक स्वार्थासाठी मूल्यांशी तडजोड केली जात आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले असल्याचे लोक पाहत आहेत. तर बंगळुरूमध्ये त्यांचे नेते एकत्र बसून हसत आहेत. बंगालमध्ये डावे, काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. ते त्यांच्या राजकीय हितासाठी जवळ येऊ शकतात, पण सोबत येऊ शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. ते त्याच्या कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत. या पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. एवढेच नाही, तर हे लोक मोदीच्या बाबतीत एवढा विचार करतात, त्यांनी देशाच्या बाबतीत एवढा विचार करायला हवा होता. 

निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले मोदी?2024 ला होणाऱ्या निवडणुकीसाठी बोलताना मोदी म्हणाले, निवडणूका जवळ येत आहेत आणि देशातील जनतेने एनडीएला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशच नाही तर परदेशातही हा आवाज ऐकू येतो आहे. जे सरकार जाणार असते, त्याच्यासोबत परकीय सरकारे वेळ घालवत नाहीत. मात्र, सर्व देश भारताचा सन्मान करत आहेत. कारण त्यांनाही माहीत आहे की, भारतातील जनतेचा एनडीएवर विश्वास आहे. भारतातील जनमत कोणाबरोबर आहे? हेही त्याना माहीत आहे. 

तसेच, एनडीएचा विस्तार हा केवळ संख्या आणि भौगोलिक विस्ताराचा नाही. तर देशातील जनताही आपला इतिहास पाहत आहे. तुमची मेहनत फळाला येणार आहे. देशातील जनतेचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस