शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 09:34 IST

मोदींच्या शायरीनंतर जावेद अख्तर यांचं ट्विट

नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल (बुधवारी) शायरीच्या माध्यमातून उत्तर दिलं. गालिबनं अशा (आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी ऐकवली. 'ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,' असं मोदी म्हणाले. आझाद यांना सर्व गोष्टींकडे राजकीय नजरेतून पाहण्याची सवय झाल्याचा टोला मोदींना शायरीतून लगावला. आम्ही लोकांच्या हितासाठी अनेक प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी आझाद यांना जुन्या भारतावरुन आझाद यांना काही प्रश्न विचारले. कॅबिनेटनं घेतलेले निर्णय पत्रकार परिषदेत फाडणारा, संरक्षण दलांच्या सामग्रीचा वापर सहलीसाठी करणारा जुना भारत तुम्हाला हवा आहे का, असे सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केले. मोदींनी शायरीचा उल्लेख केल्यानं सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर अनेकांनी पंतप्रधानांची चूक दाखवून दिली. मोदींनी सादर केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नसल्याच्या कमेंट अनेकांनी सोशल मीडियावर केल्या. प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीदेखील यावर भाष्य केलं. 'पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही. तर तो सोशल मीडियावरुन आलेला आहे. खरं तर या शेरमधील दोन ओळी योग्य मीटरमध्येही नाहीत,' असं अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाJaved Akhtarजावेद अख्तर