शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी 4 वर्षांपूर्वीच अयोध्येतील कार्यक्रमाचा...; PK नी सांगितलं काँग्रेस नेमकी कुठे चुकतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:36 IST

"मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही..."

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक तज्ज्ञ भाजप+ विरुद्ध काँग्रेस+ यांचे मूल्यांकन करताना दिसत आहेत. भाजपचा सामना करताना विरोधक नेमके कुठे उभे आहेत, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. हाच प्रश्न निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विचारला असता, त्यांनी विरोधकांना काही बारीकसारीक गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशांत किशोर म्हणाले, आपण ऐकता की, मोदीजींनी अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा समारंभ अशा वेळी ठेवला की, तो निवडणुकीच्या तीन महिने आधी व्हावा. हे असेच झाले नाही.

मोदीजींनी अयोध्येसंदर्भात 4 वर्षांपूर्वीच विचार केला असेल...-  बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पीके म्हणाले, इतर पक्षांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जानेवारी 2024 मध्ये व्हावा, यासाठी किमान 3 ते 4 वर्षांपूर्वीच कुणी विचार केला असेल आणि त्यनुसारच मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सर्व गोष्टींचा विचार त्यांनी चार वर्षांपूर्वीच केला असेल. कारण एप्रिल-मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. 

तीन वर्षांपूर्वीच करायला हवी होती आघाडी - किशोर म्हणाले, जर ही गोष्ट मोदींना माहीत आहे, ते त्या दिशेने काम करत आहेत, पत्रकारांनाही माहीत आहे, तर मग हे विरोधकांना का माहीत नव्हतं, की मंदिर निवडणुकीपूर्वीच उभे राहील, प्राणप्रतिष्ठा होईल, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. कसल्याही प्रकारची तयारी नाही. तो विचार कधी नव्हताच. जागा वाटप आज होवो अथवा 6 महिन्यांपूर्वी होवो, निवडणुकीची वेळ तर सर्वांनाच माहीत होती. जे लोक आज I.N.D.I.A.मध्ये आहेत. त्यांना ही आघाडी तयार करण्यापासून कुणी रोखले होते का? तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला असता, तीन वर्षांपूर्वीच जागावाटप केले असते. त्यांच वेळी त्यांनी आपल्या आघाडीचे नाव 'I.N.D.I.A.' ठेवले असते.

किशोर पुढे म्हणाले, विरोधकांची ही आघाडी तीन वर्षांपूर्वीच अस्तित्वात आली असती, तर अधिकांश लोकांना ती समजली असती. त्याच वेळी जागावाटप झाले असते, तर आपल्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार हेही लोकांना अधिक कळले असते. त्यांना कुणी रोखले होते? गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची आप आणि सपासोबतची युती निश्चित झाली होती. पीके यांनी याला फार उशीर झाल्याचे म्हटले आहे.

400+ एक प्रेशर...- किशोर म्हणाले, आम्ही 400 जागांवर जिंकत आहोत, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी संसदेत उभे राहून म्हणत आहेत. ते एक सायकलॉजिकल प्रेशर तयार करत आहेत. अर्थात जय-पराजयावर चर्चाच होत नाहीय. आता लोक विचारत आहेत, की 400 येणार की नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी