शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

इंधन दरवाढीवर मंथन; मोदींची तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:14 IST

इंधन दरवाढीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेल आणि गॅस क्षेत्रातील भारतासह जगभरातील कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा करणार आहेत.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. यामुळे देशातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेल आणि गॅस क्षेत्रातील भारतासह जगभरातील कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा करणार आहेत.या बैठकीचे आयोजन नीती आयोगाकडून करण्यात येत आहे. असे समजते की, या बैठकीत इराणवर अमेरिकेने लावलेले प्रतिबंध आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किमती यावर चर्चा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आजच्या होणाऱ्या वार्षिक बैठकीत तेल, गॅस आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत निर्यात देशांच्या संघटनेचे महासचिव मोहम्मद बारकिंदो आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित असणार आहेत. 

याशिवाय, बैठकीत ओएनजीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर, आईओसीचे अध्यक्ष संजीव सिंह, गेल इंडियाचे प्रमुख बीसी त्रिपाठी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मुकेश कुमार शरण, ऑइल इंडियाचे अध्यक्ष उत्पल बोरा आणि भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशनचे अध्यक्ष डी राजकुमार यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर, सौदी अरबचे पेट्रोलियम मंत्री खालिद ए अल फलीह, बीपीचे सीईओ बॉब डुडले, टोटलचे प्रमुख पॅट्रिक फॉयेन, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल आजच्या बैठकीत हजर राहतील अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधीची पहिली बैठक 5 जानेवारी 2016 मध्ये बोलाविली होती. यामध्ये नैसर्गिक गॅसच्या किंमतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गेल्यावर्षी 2017 मध्ये ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती. 

शुल्ककपातीनंतर दरवाढ सुरुचकेंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चार ऑक्टोबरला प्रतिलिटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली. मात्र त्यानंतरही दररोज इंधनाच्या दरात वाढ होतच आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFuel Hikeइंधन दरवाढ