शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम; PM मोदींच्या हस्ते पायाभरणी; सचिनसह दिग्गजांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:53 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली.

वाराणसी : उत्तर प्रदेशातीलवाराणसीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लक्षणीय ठरली. हे स्टेडियम केवळ वाराणसीसाठीच नाही तर पूर्वांचलच्या तरुणांसाठीही वरदान ठरेल. जेव्हा हे स्टेडियम तयार होईल, तेव्हा तीस हजारहून अधिक लोक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील, असे यावेळी मोदींनी सांगितले. क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांसह बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा हे देखील यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, याप्रसंगी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, रवी शास्त्री, बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाचं एवढं मोठं मैदान तयार झाल्यावर केवळ क्रीडा क्षेत्रातीलच नव्हे तर स्थानिक लोकांनाही फायदा होईल. मोठा सामना पार पडला की हॉटेल चालकांना फायदा होईल, बोट मालकांना फायदा होईल. वाराणसीमध्ये अनेक मोठे क्रीडा उद्योगही येतील. काशीमध्ये आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी झाली असून हे पूर्वांचलसाठी वरदान ठरणार आहे. यामध्ये ३० हजार लोक एकत्र बसून क्रिकेटचा सामना पाहू शकतात. यामध्ये आजूबाजूच्या भागातील युवा खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी मिळणार असून माझ्या काशी क्षेत्रातील जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढणार असून स्टेडियमची संख्याही वाढवली जाईल. उत्तर प्रदेशातील हे पहिले स्टेडियम असेल ज्यामध्ये बीसीसीआयचे सहकार्यही असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीUttar Pradeshउत्तर प्रदेशSachin Tendulkarसचिन तेंडुलकरBCCIबीसीसीआय