शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

देशाचा इतिहास केवळ तो नाही, जो गुलामगिरीच्या मानिसकतेसोबत लिहिणाऱ्यांनी लिहिला : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:10 IST

PM Narendra Modi Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजन

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजनमहाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य, मोदींचं वक्तव्य

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव स्वशासी राज्य आरोग्य महाविद्यालय, बहराईचचं लोकर्पणही केलं. यादरम्यान, त्यांनी डिजिटल माध्यमातूल उपस्थितांना संबोधित केलं. "आज मला बहराइचमध्ये महाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य लाभलं आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक ऐतिहासिक चित्तौरा तलावाचा विकास, बहराइचवरील महाराजा सुहेलदेल यांचा आशीर्वाद वाढवेल आणि येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरित करेल," असं मोदी यावेळी म्हणाले."भारताचा इतिहास केवळ तोच नाही, जो देशाला गुलाम बनवणाऱ्यांनी, गुलामगिरीच्या मानसिकतेसोबत इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला. भारताचा इतिहास तो आहे जो भारताच्या सामान्य जनतेत, भारताच्या लोकगाथांमध्ये आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. बहराइचसारख्या विकासाच्या महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधांची वाढ केल्यास येथील लोकांचे जीवन सुकर होईल. त्याचे फायदे केवळ श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर या आसपासच्या जिल्ह्यांनाच नाही तर नेपाळहून येणाऱ्या रूग्णांनाही मिळणार असल्याचं ते म्हणाले. "देशातील पाचशेपेक्षा अधिक संस्थानांना एकत्र करण्याचं कठिण काम करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेस यांच्यासोबत काय करण्यात आलं याची माहिती देशातील प्रत्येकाला आहे. आज जगातील सर्वात मोठी प्रतीमा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे. जी आम्हाला आजही प्रेरणा देत आहे," असं मोदींनी यावेळी नमूद केलं.  देशात आज अनेक असे सेनानी आहेत ज्यांचं योगदान अनेक बाबींमुळे मान्य केलं गेलं नाही. चौरी-चौराच्या वीरांसोबत काय झालं, ते आपण विसरू शकतो का? महाराजा सुहेलदेव आणि भारतीयतेच्या रक्षेसाठी त्यांच्या प्रयत्नांबाबतही असंच करण्यात आल्याचंही ते म्हणाले. "गेल्या काही काळापासून देशभरात इतिहास, आस्था, अध्यात्म आणि संस्कृतीशी निगजीत जोडलेल्या स्मारकांच्या निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटनाला चालना देणं हा त्यामागील उद्देश आहे. उत्तर प्रदेश तर पर्यटन, तीर्थक्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये समृद्ध आहे आणि त्याच्या क्षमताही अपार आहेत. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक येत असतात. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही उत्तर प्रदेश पहिल्या तीन राज्यांमध्ये आला आहे," असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ