शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Interview Live : मी त्या व्यक्तीला कसं उत्तर देऊ जो ऐकतच नाही?; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:56 IST

मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो : पंतप्रधान

PM Modi Interview Live : भारत-चीन सीमा वाद आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण न दिल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. "संबंधित मंत्रालयांद्वारे विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. जेव्हा गरज होती तेव्हा आम्हीदेखील काही विषयांवर बोलत होतो," असं मोदी म्हणाले. एनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत, ना ते कोणाचं ऐकतात ना ते सभागृहात बसतात असं वक्तव्य केलं. 

"संसदेत आम्ही चर्चेचं स्वागत करतो. मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो. कोणावर निशाणा साधण्याची भाषा मी जाणत नाही आणि हे माझ्या स्वभावातही नाही. परंतु तर्क आणि तथ्यांच्या आधारावर माध्यमं काही वाद भडकावण्यासाठी सभागृहात माझ्या शब्दांची व्याख्या करू शकतात," असं मोदी म्हणाले.आमचा चर्चेवर विश्वास"आम्ही कोणावर हल्लाबोल करत नाही. याशिवाय आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो. अनेकदा वाद, टीका या होतात. मी त्याचं स्वागत करतो आणि यासाठीच माझ्याकडे नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही. मी प्रत्येक विषयावर तथ्य सादर केली आहेत आणि त्यावरच चर्चा केली आहे. काही विषयांवर परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं विस्तृत उत्तरं दिली आहेत आणि आवश्यकता आहे तिकडे मीदेखील उत्तर दिलंय. जो ऐकतच नाही आणि संसदेत बसतच नाही? त्याचं उत्तर मी कसं देणार," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस