शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीन सीमेजवळ भारताचा महासेतू; पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:08 IST

ब्रह्मपुत्रा नदीवरील 4.94 किलोमीटर लांबीच्या पुलाचं लोकार्पण

आसाम: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं उद्घाटन केलं आहे. आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील 4.94 किलोमीटर लांबीचा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडतो. या पुलामुळे चीन सीमेपर्यंतचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अतिशय मोठं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात मोठा रेल्वे-रोड पूल उभारण्यात आला. हा पूल ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तटाला धेमाजी जिल्ह्याला जोडतो. हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार मानला जातो. कारण हा पूल डबलडेकर आहे. या पुलावरुन वाहनं आणि ट्रेन एकाचवेळी धावू शकतात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी 4857 कोटी रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान मोदींनी पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी उत्तरेच्या टोकाच्या दिशेनं प्रवास केला. अरुणाचल प्रदेश सीमेवर अनेकदा चीनकडून घुसखोरी केली जाते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुलाच्या वरील भागात तीन पदरी रस्ता आहे. या पुलाची उभारणी करताना लष्कराच्या गरजांची विशेष काळजी घेण्यात आली. या पुलावरुन लष्कराचे वजनदार रनगाडे सहजपणे जाऊ शकतात. त्याचवेळी खालील भागात रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सत्ताकाळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुलाचं काम पूर्ण झालं. त्यामुळे वाजपेयी यांच्या जयंतीला मोदींनी या पुलाचं लोकार्पण केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन