शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही माझे कुटुंब, तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प; PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 15:31 IST

PM Modi in Bulandshahr: '2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे.'

PM Modi in Bulandshahr: अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून त्यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्यांनी 19 हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधानांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले. 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जयने केली. भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. आता राष्ट्र उभारणीचा मार्ग रामाच्या नावाने आणखी मोठा होणार. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तसेच, तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प असल्याचेही म्हटले. याशिवाय, अप्रत्यक्षपणे त्यांनी 2024 मध्ये आपल्या बंपर विजयाची घोषणाही केली.

कल्याण सिंह यांची आठवणपंतप्रधान पुढे म्हणाले की, जीवनात तुमचे प्रेम आणि विश्वास मिळणे यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते. तुमच्या प्रेमाने मी भारावून गेलोय. आज एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनींना पाहतोय. आपल्या घरातील कामे सोडून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे विशेष आभार मानतो. या प्रदेशाने देशाला कल्याणजींसारखा सुपुत्र दिला, ज्यांनी आपले जीवन राम आणि राष्ट्रकार्य या दोन्हींसाठी समर्पित केले. आज ते जिथे कुठे असतील, अयोध्याधाम पाहून त्यांना खूप आनंद झाला असेल. 

विकसित भारत आमचे ध्येय पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येत मी रामललाच्या उपस्थितीत सांगितले होते की, प्राणप्रतिष्ठा करण्याचे काम पूर्ण झाले, आता देशाच्या प्रतिष्ठेला नवीन उंची देण्याची वेळ आली आहे. देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे जाण्याचा मार्ग आपल्याला पुढे करायचा आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस