शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'तो व्हिडिओ पाहून PM भावूक, दिला आदेश'; खासदाराने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:28 IST

पीडित पालकांनीही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मीडियासमोर केली आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. त्यात आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. या पीडित कुटुंबीयांस खासदार हंस राज हंस यांनी भेट दिली. तसेच, आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

पीडित पालकांनीही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मीडियासमोर केली आहे. आता, खासदार हंसराज अहिर यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी, आपणास पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा आदेश आल्याचेही त्यांनी सांगितले. हंस या पीडित कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच, आर्थिक मदतही केली. 

आम्ही राजकारणापलिकडे मुलीचे वडिलही आहोत, मुली आम्हालाही आहेत. जेव्हा व्हिडिओ पाहिला, ज्याला काळीज आहे, ज्याला स्वत:ची मुलगी आहे, म्हणूनच पंतप्रधानही स्वत: भावूक झाले, ते मुलींच्याबाबतीत अशी बातमीही ऐकू शकत नाहीत. त्यांनी आदेश दिला, गृहमंत्र्यांनीही आदेश दिला, आमचे राज्यातील प्रभारी कालपासून झोपले नाहीत, मग आपण कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहोत, अशा रितीने वरिष्ठ पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेतल्याची माहिती खासदार हंसराज हंस यांनी दिली. तसेच, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही अहिर यांनी केली. 

दरम्यान, आता मुलीच्या हत्येच्या तपासातून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडत आहेत. मागील काही दिवसांपासून मुलगी तिच्या आधीच्या प्रियकराशी संपर्कात आली होती. त्यावरून साहिलसोबत तिचे भांडण सुरू होते. याच भांडणातून साहिलने तिची हत्या केल्याचे बोलले जाते. 

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या शाहबाद डेअरी येथे २० वर्षीय साहिलने १६ वर्षीय मुलीची हत्या केली. या मुलाने क्रूररित्या मुलीला संपवले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यात साहिल कशाप्रकारे चाकूने मुलीवर वार करत असून त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करत असल्याचे दिसत आहे. 

का केली हत्या?

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात होती असा संशय साहिलला होता. इतकेच नाही तर साहिल आणि त्या मुलीमध्ये भांडणही झाले होते. यावेळी साहिलने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत बोलायची. त्याच्याशी संबंध ठेवत होती. त्यामुळे साहिल आणि मुलीमध्ये वाद व्हायचे 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीprime ministerपंतप्रधानMember of parliamentखासदार