शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना फोनवरून दिल्या शुभेच्छा, 'या' खास विषयावर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 23:40 IST

ऋषी सुनक यांनी मंगळवारी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून कारभार स्वीकारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याबरोबरच, व्यापक आणि संतुलित FTA चे महत्व, या विषयावरही चर्चा झाली. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, 'आज ऋषी सुनक यांच्यासोबत चर्चा करून आंद वाटला. ब्रिटेनच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही आपली व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी सोबतीने काम करू. आम्ही एका व्यापक आणि संतुलित FTA च्या महत्वावरही सहमती दर्शवली आहे.'

पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर सुनक यांचे उत्तर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर, ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे उत्तरही आले आहे. सुनक यांनी ट्विट केले आहे, की 'मी कार्यभार सांभाळल्याबद्दल आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. ब्रिटन आणि भारत बरेच काही शेअर करतात. आपल्या दोन्ही देशांतील सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक भागीदारी येणाऱ्या काळात कशा पद्धतीने पुढे नेता येऊ शकते, यासाठी मी उत्सुक आहे.'

दिवाळीच्याच दिवशी सुनक यांची बिनविरोध निवड - ऋषी सुनक यांनी मंगळवारी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून कारभार स्वीकारला. त्यांची दिवाळीच्याच दिवशीच कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध निवड झाली होती. ब्रिटेनचे पंतप्रधान अथवा माजी अर्थ मंत्री सुनक (42) हे हिंदू आहेत. तसेच ते 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRishi Sunakऋषी सुनकIndiaभारतEnglandइंग्लंड