शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi to CBI, CVC : केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणाला घाबरवणं नाही, तर मनातून भीती दूर करणं - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:27 IST

PM Narendra Modi : गेल्या सहा सात वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे देशात आपण एक विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहोत, पंतप्रधानांचं वक्तव्य.

ठळक मुद्देगेल्या सहा सात वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे देशात आपण एक विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहोत, पंतप्रधानांचं वक्तव्य.

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणालाही घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं आहे. भ्रष्टाचाराच पाळंमूळं आपल्याला संपवावी लागतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. एका रेकॉर्डेट व्हिडीओद्वारे त्यांनी CBI आणि CVC च्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं. 

"आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येणारी २५ वर्षे म्हणजेच अमृत काळात आपला देश आत्मनिर्भर भारतच्या संकल्पासह पुढे जात आहे. आज आपण गुड गव्हर्नन्स, प्रो पिपल, प्रो अॅक्टिव्ह गव्हर्नन्स यांना सशक्त करण्याचं काम करत आहोत," असं मोदी म्हणाले. "भ्रष्टाचार छोटा असो किंवा मोठा तो कोणा ना कोणाचा हक्क हिसावून घेतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात. तो राष्ट्राच्या प्रगतीत बाघधाही आणतो आणि सामूहिक शक्तीच्या रूपात प्रभावितही करतात," असंही ते यावेळी म्हणाले.

"देशाची फसवणूक करणारे, गरीबांना लुटणारे, कितीही ताकदवान असले तरी देश आणि जगात कुठेही असले तरी आता त्यांच्यासाठी दया दाखवली जाणार नाही, सरकार त्यांना सोडत नाही असा विश्वास आज देशातील प्रत्येकाला आला आहे," असंही मोदींनी नमूद केलं. गेल्या सहा सात वर्षांपासून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे भ्रष्टाचार रोखणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. कोणत्याही देवाण-घेवाणीशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणं शक्य आहे यावरही विश्वास निर्माण झाल्याचं ते म्हणाले.  नागरिकांवर विश्वासआज देशात जे सरकार आहे ते देशातील नागरिकांवर विश्वास ठेवतं. त्यांच्याकडे कोणत्याही शंकेच्या नजरेनं पाहत नाही. यामुळेच भ्रष्टाचाराचे अनेक रस्ते बंद झाले आहे. देशवासीयांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचं काम आम्ही एका मोहिमेच्या रूपात हाती घेतलंय. आम्ही सरकारी प्रक्रियांना सहज बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मॅक्सिमम गव्हर्मेंट कंट्रोल ऐवजी मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्सवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे, असंही मोदींनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभागGovernmentसरकार