शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:15 IST

सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत.

नवी दिल्ली : सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत. त्यांच्या सरकारचेही तेच तत्वज्ञान आहे, अशी जोरदार टीका यूपीएच्या अध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरच्या पाच वर्षांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले. बऱ्याच काळाने त्यांचे इतके आक्रमक भाषण ऐकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदारांनी व्यक्त केली. मोदी सरकार पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. दिलेली आश्वासने पाच वर्षे पूर्ण होत आली, सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असे सांगताना सोनिया गांधी यांनी रोजगाराचे आश्वासन, सामाजिक सलोखा याबरोबरच राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याचाही उल्लेख केला.नोटाबंदी हा मोदी सरकारचा मोठा घोटाळा होता. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने तसेच घाईघाईने जीएसटी लागू केल्याने अनेक उद्योग व व्यवसाय गाळात गेले, लाखो लोकांचा रोजगार गेला, याचा उल्लेख करून सोनिया गांधी म्हणाल्या की तरीही मोदी सरकार या दोन्हीला आपले यश मानत आहे.मात्र मोदी सरकारची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे. जनता या सरकारवर नाराज आहे. सरकारमुळे देशात ठिकठिकाणी निष्कारण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.जनतेचा विश्वासघातदिलेली आश्वासने पूर्ण न करणे म्हणजे जनतेचा विश्वासघातच होय आणि तो विश्वासघात मोदी सरकारने केला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. या सरकारने संसदेचे महत्त्व कमी केले. महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी हजरच राहिले नाहीत, हे त्याचे उदाहरण आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, अशी अस्वस्थता यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती.राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आपला पक्ष अतिशय आक्रमकपणे भाजपाच्या विचारसरणीशी व मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराशी लढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले; पण ही लढाई यापुढे कायम सुरू राहील. संसदेचे अधिवेशन संपले असल्याने सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊ न ही लढाई सुरू ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी