शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्कर मिळवणाऱ्या 'नाटू नाटू'ला PM मोदींकडून कौतुकाची थाप; म्हणाले, 'पुढील कित्येक वर्ष...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:02 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'आरआरआर'च्या टीमला कौतुकाची थाप दिली आहे.

एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार पटकावत देशाचं नाव उंचावलं. सर्वच भारतीय हा आनंद साजरा करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'आरआरआर'च्या टीमला  कौतुकाची थाप दिली आहे.

'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे.  कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक करत म्हणाले, 'एक्सेप्शनल! नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. पुढील अनेक वर्ष हे गाणं लोकांच्या स्मरणात राहील. हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावल्याबद्दल एमएम कीरावानी, चंद्रबोस आणि संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.'

'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...'

RRR सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने इतर सर्व हॉलिवूड गाण्यांवर मात करत हा पुरस्कार पटकावला. यासह गाण्याने इतिहासच रचला आहे. आधी गोल्डन ग्लोब आणि आता थेट ऑस्कर पुरस्कार पटकावल्याने RRR च्या टीमचे जगभरात कौतुक होत आहे. गाण्यातील ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ramcharan) यांची डान्स स्टेपही प्रचंड गाजली. ऑस्कर सोहळ्याच्या स्टेजवर हे गाणं गात प्रेक्षकांकडून गाण्याला स्टॅंडिंग ओव्हेशनही मिळालं. आजचा दिवस खरोखरंच सर्व भारतीयांच्या लक्षात राहणारा आहे हे नक्की.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRRR Movieआरआरआर सिनेमाS S Rajamouliएस.एस. राजमौलीOscarऑस्करHollywoodहॉलिवूड