शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! एकाच ठिकाणी मिळणार बी-बियाणे, खते आणि माती परीक्षणाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:53 IST

PMKSK : ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये बदलण्यात येतील. या केंद्रांवर एकाच छताखाली बियाणे, खते आणि मातीच्या चाचणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात देशातील 3.3 लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (PMKSK) मध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली. ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये बदलण्यात येतील. या केंद्रांवर एकाच छताखाली बियाणे, खते आणि मातीच्या चाचणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय, या केंद्रांवर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गोष्टींची माहिती करून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर किमान एका किरकोळ दुकानाला मॉडेल शॉप म्हणून विकसित केले जाईल, अशी सरकारची योजना आहे. या अंतर्गत जवळपास 3,30,499 किरकोळ खतांची दुकाने पीएमकेएसकेमध्ये रूपांतरित केली जातील.

600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकऱ्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ही केंद्रे वन स्टॉप शॉप म्हणून विकसित केली जाणार आहेत. सध्या खताची दुकाने उत्पादक कंपन्यांच्या डीलर नेटवर्कद्वारे चालविली जातात, परंतु तेथे शेतीशी संबंधित प्रत्येक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारा माल घेण्यासाठी 2-3 वेगवेगळ्या दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

1 कोटीहून अधिक शेतकरी सामीलकिसान सन्मान संमेलनात 1 कोटीहून अधिक शेतकरी व्हर्च्युअल माध्यमातून सामील झाले. या कार्यक्रमादरम्यान शेतीशी संबंधित 1500 स्टार्टअप्स लाँच करण्यात आले. यासोबतच खताशी संबंधित 'इंडियन एज' नावाचे ई-मासिकही सुरू करण्यात आले.

पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारीया किसान सन्मान संमेलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला. विशेष म्हणजे, केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी एकदा शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत करते. यापूर्वी सरकारने 11 हप्ते जारी केले आहेत. यावेळी जवळापस 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानची रक्कम पाठवण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी