शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

CoronaVirus: लहान भावाची 'ती' सूचना मोठ्या भावानं ऐकली; देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 7:33 PM

Coronavirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; पंतप्रधानांना स्वीकारली शिफारस

मुंबई: देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. याशिवाय त्यांच्याकडून परिस्थितीची माहितीदेखील घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यांनी उचललेल्या पावलांचं मोदींनी कौतुक केलं. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. याबद्दलचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना दिला. 'आम्ही पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर केंद्रित केलं आहे. पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी दिल्यानं व त्यांचं २-३ दिवसांचं निदान एकत्रितरीत्या हाती येत असल्यानं रुग्णांची संख्या वाढली आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं.सर्व धर्माच्या धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी करू नये तसंच सामाजिक अंतर पाळावं असं आवाहन करणं गरजेचं असल्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरेंनी केली. त्यांच्या या सूचनेचा विशेष उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी संवाद साधून तसं आवाहन करण्यास सांगितलं. पंतप्रधानांनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाची सूचना केली. राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्याटप्यानं याचं नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असं न होऊ देण्याच्या सूचना केल्या.मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मोदींना दिली. सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत, असंदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे