शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:13 IST

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि.२४) जारी करण्यात आला. परंतू काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप दोन हजार रुपयांची रक्कम जमा झालेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संयम बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कधीकधी नेटवर्क समस्या आणि खराब कनेक्टिव्हिटीमुळे असे होत असते.

शेतकऱ्यांचा लाभार्थी यादीत समावेश असूनही जर १९ व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. तसेच, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर- १५५२६१ किंवा १८००११५५२६ (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क साधू शकता. 

लगेच दुरुस्त करा 'या' चुकापीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते आणि आधार नंबरची माहिती योग्यरित्या भरली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट देऊ शकता.

> pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.> वेबसाइटवर राइट साइडला फॉर्मर कॉर्नर लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.> येथे Know Your Status वर क्लिक करा.> येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरचा ऑप्शन दिसेल.> प्रोसेस फॉलो करा, तुमची सर्व माहिती समोर येईल.> जर तुमचा आधार नंबर आणि खाते नंबर चुकीचा असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता.

दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. अशा परिस्थितीत, या शेतकऱ्यांनी वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ई-केवायसी प्रक्रिया अपडेट झाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना कधीही किंवा २० व्या हप्त्याच्या रकमेसह पाठवली जाईल.

योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता तपासणीपीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६,००० रुपये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण ६,००० रुपये ट्रान्सफर केले जातात. तसेच, केंद्र सरकारकडून या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणी केली जात आहे. कारण, या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी