पंतप्रधान चीनच्या सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

By Admin | Updated: October 28, 2016 20:43 IST2016-10-28T20:40:35+5:302016-10-28T20:43:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी चीनच्या सीमेवर आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. शनिवारी दिवाळीनिमित्ताने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भारत-चीनच्या सीमेवर माणा येथे

PM to celebrate Diwali with soldiers on Chinese border | पंतप्रधान चीनच्या सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान चीनच्या सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी चीनच्या सीमेवर आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. शनिवारी दिवाळीनिमित्ताने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भारत-चीनच्या सीमेवर माणा येथे आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

पंतप्रधान 29 ऑक्टोबरला सकाळी दिल्लीहून वायुसेनेच्या खास विमानाने गौचर येथे पोहोचतील यावेळी एमआय 17 हे हेलीकॉप्टरही त्यांच्या सोबत असेल. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल हे देखील उपस्थित असणार आहेत. सकाळी बद्रीनाथयेथे दर्शन घेऊन नंतर ते जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. 

Web Title: PM to celebrate Diwali with soldiers on Chinese border