शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात संपवण्याचा कट; आपच्या नेत्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 05:24 IST

इन्शुलिन घेऊ न देण्यावर आक्षेप, इन्सुलिन न घेतल्यास हळूहळू माणसाचे अवयव निकामी होऊ लागतात.

नवी दिल्ली : तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आहेत. तुरुंग प्रशासन  केजरीवाल यांना डॉक्टरांचे  उपचार घेऊ देण्याची मागणी मान्य करीत नसून, यातून केजरीवाल यांना संपविण्याचा कट रचला आहे, असा गंभीर आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

पक्षाच्या नेत्या आणि आप सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे १२ ते १७ एप्रिल या दिवसांतील रिडिंगस सर्वांसमोर  मांडले. या स्थितीत इन्सुलिन न घेतल्यास हळूहळू माणसाचे अवयव निकामी होऊ लागतात. सरकारचे असे वागणे निर्दयी आहे, असा आरोप आतिशी यांनी केला. न्यायालयीन कोठडी देताना कोर्टाने केजरीवाल यांना रोज शुगर लेवल तपासणे तसेच तुरुंगात ग्लुकोमीटर नेण्याची परवानगी दिली होती, याकडेही आपने सर्वांचे लक्ष वेधले. 

केजरीवाल यांच्या आहारावरून आरोप-प्रत्यारोप दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल गेल्या दहा दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांना घरातून मागविलेले अन्न खाण्याची मुभा आहे. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून उपचारासंदर्भात डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्याची तसेच इन्सुलिन घेण्याची मागणी केली होती. त्यावर ईडीने कोर्टात सांगितले होते की, केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत. शुगर वाढल्याने कोर्टातून जामीन मिळावा, यासाठी ते असे करीत आहेत. परंतु, यावर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. यावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी आहे.

कोर्टात सुनावणीवेळी केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि रमेश गुप्ता यांनी त्यांच्या आहाराची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत केजरीवाल यांना घरातून ४८ वेळा जेवण देण्यात आले आहे. यातील केवळ तीन वेळा त्यांना आंबे देण्यात आले होते. यावर कोर्टाने ईडीला आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आहाराची माहिती ईडीला का दिली?आपच्या नेत्या आणि सरकारमध्ये मंत्री असलेल्या आतिशी यांनी तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांच्या जेवणाची माहिती ईडीला ईमेलद्वारे का कळविली, असा सवाल विचारला. इंग्रजांप्रमाणे सरकार तुरुंगातील कैद्यांचे जेवण आणि औषधे रोखण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय