शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 15:56 IST

CoronaVirus: कर्ज बुडवल्याचा आरोप असलेल्या मल्ल्यानं ट्विट करून दर्शवली पैसे देण्याची तयारी

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा (मंगळवारी) आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उद्योग जगतातल्या अनेकांनी या पॅकेजचं स्वागत केलं आहे. यानंतर आता कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानंदेखील सरकारचं अभिनंदन केलं आहे. सरकारनं माझ्यासारख्या उद्योगपतीकडे दुर्लक्ष का करतंय, असा प्रश्न विजय मल्ल्यानं उपस्थित केला आहे. 'कोविड-१९ चा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदन. सरकार कितीही नोटा छापू शकतं. पण सरकारी बँकांकडून घेतलेलं १०० टक्के कर्ज परत करण्याची तयारी दर्शवणाऱ्या व्यक्तीकडे सरकार दुर्लक्ष का करतंय? कृपया मी देत असलेला पैसा विनाअट घ्या आणि हे सगळं संपवा,' असं मल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं असून त्याच्यावर सरकारी बँकांचे जवळपास ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. भारतातून पळून गेलेला मल्ल्या बऱ्याच महिन्यांपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनमधल्या न्यायालयानं मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला. त्या निकालाला मल्ल्यानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्याआधी मल्ल्यानं पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यानं जामीन मिळवला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVijay Mallyaविजय मल्ल्या