आमची हकालपी करा हो!
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
(बाबूश व माविनचा फोटो वापरावा)
आमची हकालपी करा हो!
(बाबूश व माविनचा फोटो वापरावा)बाबूश, माविनचे दु:ख : काँग्रेस हाकलत नसल्याने अस्वस्थतापणजी : आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो यांची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेस पक्षातून अजूनही आपली हकालपी होत नाही, हेच त्यांचे सध्या एकमेव दु:ख बनले आहे. मोन्सेरात हे तर आपली हकालपी व्हावी म्हणून स्वत:च दिल्लीहून प्रयत्न करू लागले असल्याची माहिती मिळाली.काँग्रेसमधून मोन्सेरात यांची हकालपी करण्याचा ठराव १७ दिवसांपूर्वी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने घेतला होता. मात्र, त्या ठरावाची अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसत नसल्याने मोन्सेरात अस्वस्थ बनले आहेत. अजून काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी मोन्सेरात यांच्या हकालपीस मान्यता दिलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईिझन फालेरो यांनी त्या विषयीची फाईल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. मोन्सेरात यांना पक्षातून हाकलले नाही, तर आपण प्रदेशाध्यक्षपद सोडेन, अशी भूमिका यापूर्वी फालेरो यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेली आहे. त्यामुळे मोन्सेरात यांची हकालपी होईलच, असे काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यांना वाटते.दुसर्या बाजूने मोन्सेरात हे स्वत: लवकर हकालपी व्हावी म्हणून धडपडत आहेत. एकदा हकालपी झाली की, असंलग्न आमदार असा मोन्सेरात यांना दर्जा मिळेल. म्हणजेच ते अपक्ष आमदार झाल्यासारखे होतील. आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे, नरेश सावळ अशा अपक्ष आमदारांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार करावी, अशी मोन्सेरात यांची कल्पना आहे; पण मोन्सेरात यांचे राजकारण हे बेभरवशाचे असल्याने अन्य अपक्ष आमदारही सावधगिरी बाळगत आहेत. आपण अपक्ष आमदार बनलो की, भाजप सरकार आपली कामे करू शकते, असेही मोन्सेरात यांना वाटत असल्याचे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले. मोन्सेरात यांनी सध्या दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळातील काहींशी संपर्क वाढविणे सुरू केले आहे. आपली काँग्रेसमधून हकालपी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांनी मंजूर करावा, असा प्रयत्न मोन्सेरात करत आहेत.दाबोळीचे काँग्रेस आमदार गुदिन्हो यांची हकालपी करण्याचा ठराव काँग्रेसने घेतलेला नाही. तथापि, गुदिन्हो यांनाही काँग्रेसमध्ये राहण्यात मुळीच रस राहिलेला नाही. २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही, याची कल्पना गुदिन्हो व मोन्सेरात या दोघांनाही आली आहे. गुदिन्हो यांनाही २०१७ साली काँग्रेसचे तिकीट नको आहे. त्यामुळे तेही आपली हकालपी व्हावी, असा प्रयत्न करत आहेत. (खास प्रतिनिधी)