पुरणचंद्र मेश्रामांची हायकोर्टात याचिका
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:26+5:302015-02-13T00:38:26+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचा कार्यकाळ संपला असून याच पदावर पुन्हा ५ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु, १२ ऑक्टोबर २०१४ रोजी कुलपतींनी त्यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी गुरुवारी कुलपती व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुरणचंद्र मेश्रामांची हायकोर्टात याचिका
न गपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचा कार्यकाळ संपला असून याच पदावर पुन्हा ५ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु, १२ ऑक्टोबर २०१४ रोजी कुलपतींनी त्यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी गुरुवारी कुलपती व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २९ मे २०१९ पर्यंत नियुक्ती कायम ठेवावी, अशी मेश्राम यांची विनंती आहे. ६ डिसेंबर २०१४ रोजी वित्त व लेखाधिकारीपदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तत्कालीन प्रभारी कुलगुरूंनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी कुलपतींना लिहिलेल्या पत्रातील आरोप काल्पनिक आहेत. व्यवस्थापन परिषदेने ७ जुलै २०१४ रोजी आपली पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे, असे मेश्राम यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. बी. जी. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.