पालेभाज्या आवक स्थिर : बाजारभावात घसरण
By Admin | Updated: January 9, 2015 00:30 IST2015-01-08T22:29:21+5:302015-01-09T00:30:01+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतीत विक्रीसाठी येणार्या पालेभाज्यांची आवक स्थिर असुन परजिल्हयातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.

पालेभाज्या आवक स्थिर : बाजारभावात घसरण
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतीत विक्रीसाठी येणार्या पालेभाज्यांची आवक स्थिर असुन परजिल्हयातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झाली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत मेथी, शेपू, कांदापात, पालक तसेच कोथिंबीर या पालेभाज्यांची आवक दैनंदिन होत असुन जवळपास ७० टक्कयांपर्यंत आवक होत आहे. आवक स्थिर असली तरी बाजारभाव जवळपास ५० टक्कयांनी घसरलेले असल्याची माहीती बाजारसमितीच्या वतीने देण्यात आली. मेथी ३ ते ५ रुपये, कांदापात ५ ते ७ रूपये, शेपू ३ ते ४ आणि कोथिंबीर २ ते ८ रुपये प्रति जुडी दराने विक्री होत असल्याचे बाजारसमितीतर्फे सांगण्यात आले आहे. परजिल्हयातील ओतूर, पुणे, संगमनेर या भागातील बाजारसमितीत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने बाजारभावात घसरण निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)