प्लास्टिक ध्वजावर लवकरच बंदी
By Admin | Updated: July 19, 2015 23:38 IST2015-07-19T23:38:52+5:302015-07-19T23:38:52+5:30
प्लास्टिक पासून बनवले जाणारे राष्ट्रीय ध्वज, त्यांची खरेदी आणि विक्रीवर देशभर लवकरच बंदी लादली जाणार आहे. याबाबतचा एक आदेश जारी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे.

प्लास्टिक ध्वजावर लवकरच बंदी
नवी दिल्ली : प्लास्टिक पासून बनवले जाणारे राष्ट्रीय ध्वज, त्यांची खरेदी आणि विक्रीवर देशभर लवकरच बंदी लादली जाणार आहे. याबाबतचा एक आदेश जारी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे.
रविवारी गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानंतर अनेकदा प्लास्टिक ध्वज रस्त्यांवर वा नाल्या-गटारांमध्ये पडलेले आढळतात. आमच्याकडे याबाबत असंख्य तक्रारी आल्या आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.