पंजाबमध्ये जन्मले प्लास्टिक बाळ
By Admin | Updated: May 13, 2015 22:37 IST2015-05-13T22:37:17+5:302015-05-13T22:37:17+5:30
अमृतसर शहरात एका महिलेने प्लास्टिक बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. राजनन्सासी जिल्ह्यात जन्मलेले

पंजाबमध्ये जन्मले प्लास्टिक बाळ
अमृतसर : अमृतसर शहरात एका महिलेने प्लास्टिक बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. राजनन्सासी जिल्ह्यात जन्मलेले हे बाळ कोलोडियन बेबी म्हणून ओळखले जाते. कोलोडियन बाळाची त्वचा ताणलेली, चकचकीत प्लास्टिकसारखी असते. बाळाचे तोंड माशासारखे असते व ओठ आणि डोळे लाल असतात. जनुकीय विकारामुळे मूल असे जन्मते. सहा लाखात एका मुलात असा विकार असू शकतो. गुरु नानकदेव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अशी माहिती दिली की, स्पर्श केला तर हे बाळ रडते. ते वाचण्याची शक्यता कमी आहे.