शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 00:34 IST

plasma therapy : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरकडून नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयाआधी कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्लीः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एम्स (AIIMS) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी प्लाझ्मा थेरपीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरकडून नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. (plasma therapy has been dropped from covid-19 treatment icmr and aiims releases new guidelines)

याआधी कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर करण्यात आला आहे.

आयसीएमआर चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही. दात्याच्या प्लाझ्माच्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. प्लाझ्मा अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.

(CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट)

यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुरुवातीच्या मध्यम रोगाच्या अवस्थेत म्हणजेच लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांच्या आत हाय डोनर प्लाझ्माची उपलब्धता झाली, तर प्लाझ्मा थेरपीच्या 'ऑफ लेबल' वापरास परवानगी देण्यात आली होती. काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांना पत्र लिहून ती काढून टाकण्याची मागणी केली होती, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्लाझ्मा थेरपीचा तर्कहीनप्लाझ्मा थेरपीचा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग केला जात असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही हे पत्र पाठविण्यात आले. प्लाझ्मा पद्धत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि पुरावा यावर आधारित नाही. देशभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या सुरू असलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. असे असूनही देशभरातील रुग्णालयात याचा उपयोग तर्कहीनपणे केला जात आहे.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?प्लाझ्मा थेरपीमध्ये, कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तात उपस्थित अँटीबॉडीज गंभीर रुग्णांना दिली जातात. वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते, 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेतल्यानंतर असे आढळून आले की, यामुळे रुग्णांच्या मृत्यू आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन