Planetary Parade 2022: तब्बल १ हजार ७५ वर्षांनंतर आकाशात दिसणार अद्भूत दृश्य, कुठे आणि कधी पाहता येईल हा नजारा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:12 AM2022-04-27T10:12:18+5:302022-04-27T10:12:59+5:30

Planetary Parade 2022:

Planetary Parade 2022: Find out where and when this amazing sight will be seen in the sky after 1,075 years | Planetary Parade 2022: तब्बल १ हजार ७५ वर्षांनंतर आकाशात दिसणार अद्भूत दृश्य, कुठे आणि कधी पाहता येईल हा नजारा, जाणून घ्या

Planetary Parade 2022: तब्बल १ हजार ७५ वर्षांनंतर आकाशात दिसणार अद्भूत दृश्य, कुठे आणि कधी पाहता येईल हा नजारा, जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली - या आठवड्यामध्ये ब्रह्मांडामध्ये एक दुर्मीय योगायोग दिसणार आहे. विश्वाचा हा अद्भूत नजारा अगदी साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे सूर्यमालेतील ग्रह एका रेषेमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी असे दृश्य इसवी सन ९४७ मध्ये दिसले होते. सूर्योदयापूर्वी एक तास आधी आकाशात या दुर्मीळ योगायोगाचे साक्षीदार होता येणार आहे.

पठाणी सामंत तारामंडळ ग्रह परेडचे उपसंचालक डॉ. एस. पटनायक यांनी सांगितले की, या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू एका रेषेमध्ये राहतील. यापूर्वी असा योग इस ९४७ मध्ये आला होता. हे दृश्य साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. हा नजारा सूर्योदयापूर्वी एक तास आधी आकाशामध्ये दिसेल.

उत्तर गोलार्धातील म्हणजे इक्वोटर लाइनच्या वरील भागातील देशातून हा नयनरम्य देखावा पाहता येणार आहे. भारतातूनही हे चित्र अगदी सहजपणे दिसणार आहे. जर त्यावेळी आकाश स्वच्छ असेल तर हा नजार पाहता येणार आहे. जर तुम्हालाही हे दुर्मीळ दृष्य पाहायचे असेल तर सूर्योदयापूर्वी आकाशात पाहावे लागेल.

जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीने सांगितले की, ग्रह अशा प्रकारे एका ओळीत आले याचा अर्थ सर्व ग्रह एकमेकांच्या जवळ आले असा होत नाही. हे ग्रह अंतराळात एकमेकांपासून अद्यापही अब्जावधी किमी दूर आहेत. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. आपली पृथ्वीही सूर्याभोवती फिरत आहे.   

Web Title: Planetary Parade 2022: Find out where and when this amazing sight will be seen in the sky after 1,075 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.