भूखंड वादातून खूनप्रकरण
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:34+5:302015-01-09T01:18:34+5:30
पाच आरोपींना जामीन नाकारला

भूखंड वादातून खूनप्रकरण
प च आरोपींना जामीन नाकारलान्यायालय : भूखंड वादातून खूनप्रकरणनागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांजरी येथे भूखंड वादातून झालेल्या जमीलखान िदलावरखान पटेल खून प्रकरणी गुरुवारी अितिरक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूयर्वंशी यांच्या न्यायालयाने पाच आरोपींचा जामीन अजर् फेटाळून लावला. शेख जाफर, सागीर अन्सारी, बाबू पन्नीखान, आिसफ मेमन आिण शेख समीर, अशी आरोपीची नावे आहेत. या प्रकरणाची मािहती अशी, िदघोरी येथील जमीलखान िदलावरखान पटेल याने िदघोरी येथील रिहवासी दत्तात्रय कोळंबकर यांचे वांजरी येथे दोन भूखंड खरेदी केले होते. त्यावर प्लािस्टक दाण्याचा कारखाना उभारला होता. परंतु या भूखंडांवर सागीर अन्सारी याने दावा केला होता. आपण हे भूखंड कोळंबकर यांच्याकडून खरेदी केल्याचा करार केला होता, असे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात त्याने कोळंबकर यांना पैसे िदले नव्हते. केवळ करार केला होता. त्यांनी १५ िडसेंबर २०१३ रोजी कळंबकर याच्या घरावर हल्लाही केला होता. पटेललाही त्याने धमकी िदली होती. मात्र त्याने यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली होती. १ सप्टेंबर २०१४ रोजी हे पाच आरोपी आिण आणखी दोघे पटेल याच्या भूखंडांवर गेले होते. त्यावेळी त्याने जमीलखान पटेलचा भाऊ नईम याला धक्काबुक्की केली होती. त्याच वेळी नईमखान याने आपला भाऊ वकीलखान याला कागदपत्र घेऊन बोलावले होते. िदलावर हा घटनास्थळीच थांबला होता तर नईम आिण वकील हे दोघे यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले होते. त्यावेळी आरोपींनी सब्बल, लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून िदलावरखान याचा िनघृर्ण खून केला होता. त्यांनी जािमनासाठी अजर् केला असता या प्रकरणात प्रथम दशर्नी सबळ पुरावे असल्याचे आढळून आल्याने आरोपींचा जामीन अजर् फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने िजल्हा सरकारी वकील िवजय कोल्हे तर आरोपींच्या वतीने ॲड. कमल सतुजा, ॲड. अशोक भांगडे, ॲड. चेतन ठाकूर, ॲड. रऊफ िसद्दीकी यांनी काम पािहले.