शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा आवश्यक', काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:11 IST

Places of Worship Act : गेल्या काही काळापासून देशात प्रार्थनास्थळ कायद्यावरुन जोरदार वादंग सुरू आहे.

Places of Worship Act : गेल्या काही काळापासून देशात प्रार्थनास्थळ कायद्यावरुन जोरदार वादंग सुरू आहे. आता या कायद्याबाबत काँग्रेसनेसर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी यापूर्वीही अनेकांनी याचिका दाखल केल्या आहेत. यावर येत्या 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. काँग्रेसने आपल्या याचिकेत हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहेत.

मागील सुनावणीत काय झाले?तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी इतर याचिकांवर सुनावणी करताना अंतरिम आदेश जारी केला होता. त्या आदेशात देशभरातील न्यायालयांना सध्या धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाचे आदेश न देण्यास सांगण्यात आले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्ट केले होते की, धार्मिक स्थळांबाबत नवीन खटले दाखल केले जाऊ शकतात, परंतु न्यायालयांनी त्यांची सुनावणीसाठी नोंद करू नये किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये. 

कोणी दाखल केली याचिका?या प्रकरणी यापूर्वी जमियत उलेमा-ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मशिदी आणि दर्गे, ही हिंदू मंदिरे असल्याचा दावा करत देशभरात दाखल होणाऱ्या खटल्यांना सीपीएमने विरोध केला आहे. याला धर्मनिरपेक्षतेला धोका असल्याचे सीपीआयने म्हटले आहे.

प्रार्थनास्थळ कायदा काय आहे?1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांची 15 ऑगस्ट 1947 नंतर स्थिती बदलली जाऊ शकत नाही. या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये म्हटले आहे की, हा कायदा हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध समुदायांना त्यांच्या हक्कांच्या मागणीपासून वंचित ठेवतो. कोणताही मुद्दा कोर्टात मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, पण 'प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट' नागरिकांचा हा अधिकार हिरावून घेतो. हे न्याय मिळवण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन तर आहेच, पण धार्मिक आधारावरही भेदभाव आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय