त्यागी भवनचे थाटात लोकार्पण
By Admin | Updated: January 24, 2016 22:19 IST2016-01-24T22:19:45+5:302016-01-24T22:19:45+5:30
जळगाव : शहरातील शिवाजीनगर मधील लाल दिगंबर जैन मंदिरातील वीतराग भवनच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या त्यागी भवनचे रविवारी दुपारी पुनमचंद ठोले व कुटुंबियांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.

त्यागी भवनचे थाटात लोकार्पण
ज गाव : शहरातील शिवाजीनगर मधील लाल दिगंबर जैन मंदिरातील वीतराग भवनच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या त्यागी भवनचे रविवारी दुपारी पुनमचंद ठोले व कुटुंबियांच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले. श्री १००८ भगवान शांतीनाथ यांच्या कृपेने तसेच प.पु. गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी महाराज यांचे सुशिष्य प.पु. मुनीश्री विशेषसागरजी महाराज यांचे आशीर्वाद तसेच पावन सान्निध्यात हा सोहळा झाला. या सोहळ्यानिमित्त सकाळी साडे सहा ते साडे सात वाजेदरम्यान अभिषेक, शांतीधारा, पात्र शुद्धी, साडे सात ते १२ दरम्यान पंच परमेष्ठी विधान तसेच मुनीश्री विशेषसागरजी महारात यांचे प्रवचन झाले. त्यानंतर १२ ते १२.३० दरम्यान त्यागी भवनचे लोकार्पण होऊन प्रकाश गुजराथी, सुशिल जैन, नीलेश जैन यांना सन्मानपत्र देण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता मंगल आरती झाली. तत्पूर्वी सोहळ्यादरम्यान विधानाचार्य संजय सरस (बैतुल), संगीतकार किशोर कुमार (भोपाल) यांचा तसेच रमेशचंद काला यांचा सत्कार करण्यात आला.