पीयूष गोयल यांच्यावर दौऱ्याची जबाबदारी

By Admin | Updated: January 23, 2015 01:48 IST2015-01-23T01:48:48+5:302015-01-23T01:48:48+5:30

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान, केंद्रीय वीज व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांची ‘मिनिस्टर इन वेटिंग’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Piyush Goyal is responsible for the tour | पीयूष गोयल यांच्यावर दौऱ्याची जबाबदारी

पीयूष गोयल यांच्यावर दौऱ्याची जबाबदारी

नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान, केंद्रीय वीज व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांची ‘मिनिस्टर इन वेटिंग’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज ही माहिती दिली. ओबामा यांच्या दौऱ्याची माहिती देताना या प्रवक्त्याने सांगितले की, ओबामा राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबामा हैद्राबाद हाऊस येथे रविवारी आयोजित भोजनावेळी चर्चा करतील. संध्याकाळी ओबामा राष्ट्राध्यक्ष प्रणव मुखर्जी यांच्याशी बातचीत करणार आहेत. राष्ट्रपतींद्वारे ओबामा यांच्या सन्मानार्थ रात्री स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Piyush Goyal is responsible for the tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.