शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्ष संपला; काँग्रेसकडून तीन राज्यांतील २२९ उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 06:21 IST

मध्य प्रदेश १४४, छत्तीसगड ३०, तेलंगणात ५५ नावे घोषित

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पितृपक्ष संपताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी २२९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशातील १४४, छत्तीसगडमधील ३० आणि तेलंगणातील ५५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

काँग्रेसने छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांना राघौगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कमलनाथ सरकारमध्ये ते मंत्री होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ पाटणमधून, तर उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना अंबिकापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसकडून  एआयचा वापरछत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि विरोधी पक्षांच्या कथित प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसची ‘वॉर रूम’ सज्ज आहे. तेथे सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि आणि इतर पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशात ६९ आमदार रिंगणातकाँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये जाहीर केलेल्या १४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ६९ विद्यमान आमदारांना तिकिटे दिली आहेत. नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले भाजपचे माजी खासदार बोधसिंग भगत यांना बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री अजय सिंग, रामनिवास रावत, लखन सिंग यादव, हर्ष यादव, मुकेश नायक, कमलेश्वर पटेल, लखा घंघोरियांना उमेदवारी मिळाली.

छत्तीसगडमध्ये नव्या-जुन्यांचा संगमछत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांवर आशा ठेवत काही नवीन चेहऱ्यांनाही प्रतिनिधित्व दिले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल, सर्व १२ कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांच्यासह २२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली. आठ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले.

शिवराज सिंह करतील ‘हनुमाना’शी दोन हात भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात काँग्रेसने लोकप्रिय अभिनेते विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे. मस्ताल हे आनंद सागर यांच्या २००८ मध्ये दूरचित्रवाणीवर गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.  बुधनी मतदारसंघात चौहान यांच्या विरोधात विक्रम मस्ताल यांचा सामना होणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेस