राजमुंदरी : आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पाईपलाईन स्फोटप्रकरणी राज्य पोलिसांनी गॅस प्राधिकरण लि. (गेल) विरुद्ध शनिवारी नवा गुन्हा दाखल केला़ दरम्यान, या स्फोटातील बळींची संख्या वाढून 17 झाली आह़े अद्यापही सहा जखमींची स्थिती गंभीर आह़े
पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी गेलविरुद्ध काल शुक्रवारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 (अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता़ आज शनिवारी गेलविरुद्ध भादंविच्या कलम 3क्4 अ (निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू), कलम 338(दुस:याचा जीव वा त्याची सुरक्षा धोक्यात घालणो) आणि कलम 286 (स्फोटक सामग्रींबाबत हयगय) अंतर्गत आणखी नवा गुन्हा दाखल करण्यात आला़ शनिवारी या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याचसोबत बळींची संख्या 17 वर पोहोचली़ पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नगरम गावात शुक्रवारी गेलच्या पाईपलाईनचा भीषण स्फोट होऊन त्यात 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 18 जण जखमी झाले होत़े (वृत्तसंस्था)