शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:08 IST

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

Pinarayi Vijayan Protest in Delhi: दक्षिणेत राज्ये अनेकदा केंद्र सरकारवर अन्याय केल्याचा आरोप करत असतात. आता परत एकदा दक्षिण vs उत्तर वाद सुरू झाला आहे. कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन निदर्शने केली असून, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्यांचे प्रमुख राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी आले आहेत. बुधवारी (7 फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या सर्व आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांसह निषेध करण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आता गुरुवारी (8 फेब्रुवारी) केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आपल्या आमदार आणि खासदारांसह दिल्लीत आहेत. दोन्ही राज्यांच्या आंदोलनाचे कारण एकच आहे. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांशी आर्थिक भेदभाव करत असल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी केला.

केंद्राविरोधात निषेध नोदवण्यासाठी बुधवारी कर्नाटक तर गुरुवारी केरळचे सत्ताधारी आमदार एकत्र आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असून, आहे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना केंद्राविरोधातील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार अनुदान नाकारुन राज्याच्या आर्थिक लाभात कपात करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, आंदोलनाचा उद्देश केवळ केरळच नाही तर सर्व राज्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे आहे, असेही ते म्हणाले. 

दक्षिणेतील तीन राज्यांचा केंद्राला विरोधकर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विरोध करत असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव कर असून, राज्य सरकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी