पिंपळदरीला पाणी मिळणार; पण रस्त्याचे काय

By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

पाणी मिळणार; पण रस्त्याचे काय?

Pimpalpreet will get water; But what about the road? | पिंपळदरीला पाणी मिळणार; पण रस्त्याचे काय

पिंपळदरीला पाणी मिळणार; पण रस्त्याचे काय

णी मिळणार; पण रस्त्याचे काय?
पिंपळदरी : गावकर्‍यांचा सवाल
सिल्लोड : तालुक्यातील पिंपळदरी गावात अंतर्गत पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनचे काम सुरू झाले असले तरी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले सिमंेट रस्ते मात्र या कामामुळे उखडून जाणार आहेत. या कामामुळे पाणी जरी मिळणार असले तरी रस्ते उखडल्यानंतर हे रस्ते ग्रामपंचायत दुरुस्त करणार काय, असा प्रश्न गावकर्‍यांतून उपस्थित करण्यात येत आहे.
या गावात अंतर्गत पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात पाईपलाईन टाकण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदावे लागत आहेत. परिणामी या खोदकामामुळे लाखो रुपये खर्च करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते उखडणार असून रस्त्याचे तीनतेरा वाजणार आहेत. त्यामुळे पादचारी, वाहन चालक, तसेच बैलगाड्यांसाठी मोठा अडथळा निर्माण होणार आहे. वास्तविक हा या रस्त्याचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर येणार असून ग्रामपंचायतीची डोकेदुखी ठरणार आहे.
पाणीपुरवठा करणार्‍या अंतर्गत पाईपलाईनचे काम झाल्यानंतर उखडलेला रस्ता ग्रामपंचायत दुरुस्त करणार काय, असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.

Web Title: Pimpalpreet will get water; But what about the road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.