इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिग करण्यात आले. या विमानाचे एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पायलटच्या हुशारीमुळे १९१ प्रवाशांचा जीव वाचला, दिल्लीहून हे विमान गोव्यासाठी निघाले होते. पण, अचानक झालेल्या बिघाडामुळे हे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. यावेळी पायलटने एटीसीला 'PAN PAN PAN' हा मेसेज पाठवला. या मेसेजनंतर मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी देण्यात आली.
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
पायलटने मुंबई विमान तळाला हा मेसेज पाठवल्यानंतर विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या. आग्निशमच्या गाड्या सज्ज झाल्या.इंडिगोचे हे विमान 6E 6271 हे विमान होते. यामागील कारण इंजिनमधील बिघाड असल्याचे सांगितले जात आहे.
विमानाचा नियोजित लँडिंग वेळ रात्री 9.42 वाजता होता, पण पायलटने रात्री 9.25 वाजता धोक्याचा संकेत दिला. पायलटने 'पॅन पॅन पॅन' म्हटले, त्यानंतर विमान रात्री 9.52 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
'PAN PAN PAN' चा अर्थ काय?
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या पायलटने विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे 'पॅन पॅन पॅन' असा एटीसीला मेसेज पाठवला. हा एक आपत्कालीन संदेश आहे जो कोणत्याही जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीचा संकेत देतो.
इंडिगो विमान 6E 6271 एअरबस ए320 निओमध्ये दोन इंजिन आहेत. अशा विमानांमध्ये एका इंजिनवरही सुरक्षितपणे उतरण्याची क्षमता असते. या प्रकरणातही असेच घडले आणि नंतर मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
पॅन पॅन पॅन आणि मेडे मधील फरक काय?
पॅन पॅन पॅन हा विमान वाहतूक संप्रेषणात वापरला जाणारा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संदेश आहे.
तो मध्यम आपत्कालीन स्थिती दर्शवितो.
कोणताही तात्काळ धोका नाही, पण परिस्थितीला तात्काळ मदत किंवा लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते.
याचा अर्थ असा की तो मेडे पेक्षा कमी गंभीर परिस्थिती दर्शवितो.माडे विमान तात्काळ धोक्यात असताना वापरला जातो.पॅन पॅन पॅन खराबी दर्शवितो आणि तात्काळ मदतीची आवश्यकता दर्शवितो.
हे फ्रेंच शब्द 'पॅन' पासून आला आहे, याचा अर्थ दोष किंवा समस्या आहे.