शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

तीर्थक्षेत्राचा दर्जा

By admin | Updated: May 30, 2016 00:37 IST

नशिराबाद- ग्रामदैवत संत झिपरुअण्णा महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही प्रमाणात काम झाले. तत्कालिन सभापती कमलाकर रोटे व स्मारक समितीच्या प्रयत्नांमुळे नदीपात्र परिसरात विकास काम झाले. त्यानंतर आजपर्यंत कुठलेही काम झाले नसल्याची खंत झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकास निधीतून श्रींच्या मंदिर परिसरात सौंदर्यीकरण व कायापालट, विकास कामे होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी पाठपुरावा करुन विकास कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नशिराबाद- ग्रामदैवत संत झिपरुअण्णा महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही प्रमाणात काम झाले. तत्कालिन सभापती कमलाकर रोटे व स्मारक समितीच्या प्रयत्नांमुळे नदीपात्र परिसरात विकास काम झाले. त्यानंतर आजपर्यंत कुठलेही काम झाले नसल्याची खंत झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकास निधीतून श्रींच्या मंदिर परिसरात सौंदर्यीकरण व कायापालट, विकास कामे होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी पाठपुरावा करुन विकास कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्मारक समितीच्या भावी संकल्पना
झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीतर्फे विविध संकल्पनांचा आराखडा तयार आहे त्यात परिसरात सौंदर्यीकरण करुन उद्यान, वॉटर टँक, भव्य ध्यान पारायण सभागृह, अन्नछत्र सभागृह, अण्णासागर आदी संकल्पना आहे. दर गुरुवारी देण्यात येणारा पिठल भाकरीचा महाप्रसाद भाविकांच्या योगदानातून दररोज महाप्रसाद वाटप करण्याची संकल्पना आहे. शेगाव-शिर्डी- अक्कलकोट प्रमाणे येथेही अन्नछत्र दररोज सुरू करावे, असा मानस असल्याचे स्मारक समितीने व्यक्त केला आहे. त्याबाबत पाऊले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सव तयारीला वेग
श्रींची पुण्यतिथी सोहळा सोमवारी होत आहे. वैशाख वद्य नवमीला अर्थात् २१ मे १९४९ रोजी संत झिपरुअण्णामहाराज यांचे निर्वाण झाले. श्रींची पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे येत आहे. पालखीस स्नान घालणे, पूर्व तयारी करणे आदी कामांची लगबग सुरू आहे. गावातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा पालखी काढण्याची प्रथा आजही सुरू आहे. श्रींचे ज्यास्थानी निर्वाण झाले त्या जागी श्री कुळकर्णी यांचे घरी पालखी नेण्यात येते. तेथे विधिवत पूजन करुन पालखी सोहळा मंदिरात दुपारी येत असतो. महाआरती महाप्रसाद वाटप होतो. महाप्रसादासाठी लागणारे साहित्य आदी नियोजन सुरु आहे.
झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीचे रमेश सराफ, विनायक वाणी, ॲड.मोहन देशपांडे, सुरेश अकोले, मंगल तारे, कैलास व्यवहारे, सुधीर मोहरीर, गणपत भारुळे, जयंत गुरव आदी परिश्रम घेत आहेत.