शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

मोदी आणि शहांची झोप उडवू शकणारा हाच 'तो' फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 21:10 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीला भाजपाविरोधातील पक्षनेत्यांची उपस्थिती एक वेगळा संदेश देणारी आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही एकता टिकली तर भाजपासाठी बहुसंख्य जागी लढत सोपी नसणार आहे.

ज्यांचे नाव घेतले तरी अनेक राजकारण्यांची झोप उडते त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडवण्याची शक्यता एका फोटोमुळे निर्माण झाली आहे. हा फोटो त्याच बंगळुरुमधील आहेत, जेथून आलेल्या विजयाच्या बातमीनंतर शहांचे दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयात फुलांच्या वर्षावात स्वागत झाले. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देशभरातील भाजपाविरोधकांची एकजूट झाली आहे. एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रभावाखालील राज्यांमधून चारशेपेक्षाही जास्त खासदार निवडून येतात. त्यामुळे किमान तेवढ्या जागी भाजपाला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच आता पुन्हा शहांना त्यांची रणनिती नव्याने आखावी लागणार आहे.

कर्नाटक भारतीय जनता पार्टीसाठी समीकरण बिघडवणारे राज्य ठरु लागले आहे. विधानसभा निव़डणुकीत सर्वस्व पणाला लावल्यानंतरही बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या मदतीने स्थापन केलेले सरकार अडीच दिवसांचेच ठरले. तेथे भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जे समीकरण जुळवले गेले ते आता विरोधी पक्षांच्या एकतेसाठी प्रेरक ठरु लागले आहे. खरेतर याची खरी सुरुवात उत्तरप्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांपासून झाली. तेथे २२ वर्षांचे शत्रूत्व विसरत बसपाच्या मायावतींनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला. भाजपाच्या दोन्ही जागा हिसकावून घेण्यात अखिलेश यादवना यश मिळाले. आपण एकत्र आलो तर भाजपाला रोखणे शक्य आहे हे भाजपाविरोधकांच्या लक्षात येऊ लागले. पण तरीही कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष वेगवेगळे लढले. त्यांची एकत्रित मते भाजपापेक्षा २० टक्क्यांनी जास्त तर आमदारांची संख्याही १३ ने जास्त आहेत. त्यामुळे एकत्र लढण्याची गरज अस्तित्वासाठी आवश्यक असल्याचे ओळखून दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महत्वाची भूमिका बजवाल्याचे बोलले जाते. त्यांनी सोनिया गांधींच्या कानावर अशा युतीची गरज घातली. त्यातूनच काँग्रेसने जनता दल धर्मनिरपेक्षला बिनशर्त पाठिंबा दिला. विरोधकांच्या एकतेचा हाच प्रयोग घडवण्यासाठीच कर्नाटकातील आपल्या शपथविधीला मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देशभरातील भाजपा विरोधकांना निमंत्रण दिले. त्यातूनच किमान १५ पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांचे आपापल्या प्रभावाखालील राज्यात पुढीलप्रमाणे बळ आहे.

उपस्थित नेते                                पक्ष                                          कार्यक्षेत्र           लोकसभा मतदारसंघ

  1. सोनिया गांधी, राहुल गांधी            काँग्रेस                                        देशभर        
  2. एच.डी. देवेगौडा                          जनता दल (धर्मनिरपेक्ष)             कर्नाटक              ०२८        
  3. ममता बॅनर्जी                                तृणमूल काँग्रेस                           बंगाल                 0४२
  4. मायावती                                      बसपा                                        उत्तरप्रदेश          0७८
  5. अखिलेश यादव                            समाजवादी पार्टी                        उत्तरप्रदेश
  6. शरद पवार                                   राष्ट्रवादी काँग्रेस                         महाराष्ट्र              0४८
  7. सीताराम येचुरी                             मार्क्सवादी कम्युनिस्ट                केरळ, त्रिपुरा      0२२
  8. डी. राजा                                       कम्युनिस्ट                                केरळ, त्रिपुरा        
  9. तेजस्वी यादव                                राष्ट्रीय जनता दल                     बिहार                   ०३३    
  10. शरद यादव                                   जनता दल                                बिहार
  11. कनिमोझी                                     द्रमुक                                       तमिळनाडू           ०३२
  12. चंद्राबाबू नायडू                             तेलुगू देशम                              आंध्रप्रदेश             ०३४
  13. अरविंद केजरीवाल                       आप                                         दिल्ली                   ००६
  14. कुन्हालीकुट्टी                                 मुस्लीम लीग                            केरळ    
  15. उमर अब्दुल्ला                              नॅशनल कॉन्फरन्स                   जम्मू-काश्मिर       ००६    

                                                                                                                                    ३२९काँग्रेस कार्यक्षेत्रातील अन्य राज्यपंजाब (१०),     पदुचेरी (०१), राजस्थान (१८), मध्यप्रदेश (२०), इतर                              ०७०एकूण                                                                                                                    ३९९

काँग्रेस आणि अन्य भाजपा विरोधक यांची जर खरोखरच युती झाली आणि त्या युतीने २०१४ च्या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या तर भाजपाला किमान ४०० जागांवर कडव्या लढतीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. तसेच उरलेल्या १४५ जागांपैकी इशान्येतील राज्ये, ओडिशा, अंदमान निकोबार, लक्षद्विप अशा राज्यांमधील स्थितीही त्यावेळच्या राजकीय स्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे भाजपासाठी मिशन २०१९ वाटत होते तेवढेसे सोपे राहिलेले नाही, असे म्हटले जाते.अर्थात याचा अर्थ असा नाही की बंगळुरुला एकत्र आले म्हणजे हे सर्व पक्ष एकवटलेच. तसे होणे सोपे नाही. डावे आणि ममता बॅनर्जी एकत्र येणे अशक्यच आहे. कारण बंगालात दोघेही प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. तसेच दिल्लीत आप आणि काँग्रेसचे.  महाराष्ट्रात शिवसेना भाजपासोबत गेली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊनही लढत सोपी नसणार. आंध्रात तेलुगु देशम विरोधात जाणार असेल तर भाजपा वाएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींना अभय देऊन सोबत घेऊ शकेल. तसेच तेलंगणात चंद्रशेखर रावना पटवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अर्थात तेथे तेवढे सोपे नसेल. तामिळनाडूचे स्टालिन आणि कनिमोळी द्रमुकतर्फे आले असले तरी भाजपा अण्णा द्रमुकला सोबत घेऊ शकते. अर्थात स्टरलाइट गोळीबारातील बारा बळींमुळे परिस्थिती अवघड आहे. बरेच काही मध्यप्रदेश, राजस्थानच्या निकालांवरही अवलंबून आहे. अर्थात असे असले तरीही बंगळुरुतील भाजपाविरोधकांचा ग्रुप फोटो भाजपा श्रेष्ठींची झोप उडवण्यास पुरेसा असल्याचे म्हटले जाते ते काही अगदीच चुकीचे नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८kumarswamyकुमारस्वामीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार