बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो, अमेरिकी कंपनीचा प्रताप
By Admin | Updated: February 21, 2017 21:29 IST2017-02-21T21:19:30+5:302017-02-21T21:29:44+5:30
अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल

बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो, अमेरिकी कंपनीचा प्रताप
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेलं निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. yeswevibe.com आणि lostcoast.com अशी या वेबसाइटची नावं आहेत.
हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, भारत स्काउट्स अॅन्ड गाइड्सचे कमिश्नर नरेश कडयान यांनी याबाबत तक्रार दाखल केली. याबाबत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहूनही कळवलं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या प्रशांत विहार पोलीस स्थानकात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम 295 अ आणि 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुर्वी कॅनडातील अॅमेझॉनच्या वेबसाइटवरही तिरंगा असलेल्या पायपुसणीची विक्री सुरू होती. त्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनच्या एकाही अधिका-याला व्हिसा देणार नाही अशी धमकी दिल्यावर अॅमेझॉनने माफी मागितली होती.