उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवा वाद, रेशन कार्डवर मुख्यमंत्र्यांचा फोटो
By Admin | Updated: October 19, 2016 19:13 IST2016-10-19T19:13:06+5:302016-10-19T19:13:06+5:30
उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. येथील रेशन कार्डवर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो छापून येत असल्याने हा वाद सुरू

उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवा वाद, रेशन कार्डवर मुख्यमंत्र्यांचा फोटो
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. येथील रेशन कार्डवर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो छापून येत असल्याने हा वाद सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सरकारी खर्चाचा वापर करण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. येथील नवीन रेशन कार्डच्या कव्हरवर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा फोटो छापून येत आहे. मात्र, अखिलेश यादव यांना यामध्ये काही गैर वाटत नाही. यावर स्पष्टिकरण देताना ते म्हणाले 'आम्ही कामं केली आहेत तर प्रचारसुद्धा करणार. आम्ही गरिबांची मदत करत आहोत तर किमान आमच्या सरकारचा प्रचार व्हायला हवा असं ते म्हणाले'.
या नव्या वादामुळे आता उत्तर प्रदेशचं राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.